Home - Uncatagarised

योग शिक्षणाची सक्ती नाही

August 8, 2017 By lakshavedhTags

share this article

Uncatagarised

योग शिक्षणाची सक्ती नाही

देशात भाजपचे सरकार आल्यापासून बऱ्याच क्षेत्रात बदलाचे वारे वाहत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये योग शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला. मात्र, शिक्षण हक्क कायद्यातील मार्गदर्शक सूचनानुसार योग शिक्षणाची सक्ती करता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र 8 आॅगस्ट रोजी सर्वाेच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये योग संबंधित पाठ्यपुस्तक व दिशानिर्देश स्पष्ट करण्यात यावे अश्या मागणीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर झालेल्या सुनावणी दरम्यान मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे वरील प्रतिज्ञपत्र दाखल करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने शालेय अभ्यासक्रमात काय शिकवावे हा निर्णय घेण्याच्या अधिकार आपला नसल्याचे नमूद करून याचिका फेटाळली व याबाबत शासनाने काय तो निर्णय घ्यावा असे निर्देश दिले.
सर्वाेच्च न्यायालयात याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये 1 ते 8 वीपर्यंत योग शिक्षणाचे धडे नियमित देण्यात यावे व त्या संदर्भातील पाठ्यपुस्तक उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या शिक्षण हक्क काद्यामध्ये योग शिक्षणासंबंधी कुठलेच निर्देश नाही. परंतु आरोग्य व शारीरिक शिक्षणाच्या अभ्याक्रमामध्ये योगाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यानुसार 1 ते 10 इयत्तेपर्यंत हा अभ्यासक्रम सक्तीचा आहे. परंतु 11 व 12 वीला या विषयाचा पर्याय देण्यात आला आहे.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft