Home - World

जगात तरुणांमध्ये सर्वाधिक श्रीमंत आहे ही तरुणी

June 5, 2018 By lakshavedhTags

share this article

World

जगात तरुणांमध्ये सर्वाधिक श्रीमंत आहे ही तरुणी

हॉलिवूडपटातील अभिनेत्रीलाही मागे टाकेल असे सौंदर्य असलेली नॉर्वेतील सुंदरी अलेक्झांड्रा अँडर्सन ही केवळ 19 वर्षाची मुलगी जगातील सर्वात कमी वयाची अब्जाधीश आहे. तिची सर्वात तरुण अब्जाधीश अशी नोंद फोर्ब्जच्या यादीत झाली आहे. 1.21 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 8123कोटी रुपये तिच्याकडे आहेत.

जर्मनीमध्ये राहणारी अलेक्झांड्रा अँडर्सन एक व्यावसायिक घोडेस्वारही आहे. युरोपमधील जूनियर हॉर्सराडर्स चँपियनशिपची ती अनेकवेळा विजेती ठरली आहे. तिची कंपनी आहे. त्यासाठी ती स्वतः जास्त काम करत नाही. त्यामुळे आपला एवढ्या मोठ्या मालमत्तेवर हक्क आहे असे तिला मात्र वाटत नाही. अलेक्झांड्रा अँडर्सनचे वडिल जॉन अँडर्सन यांचा तंबाखूचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीचे 80 टक्के शेअर त्यांच्या दोन मुलींच्या नावे 2007साली केले होते. अलेक्झांड्रा अँडर्सन ही तिची बहिण कॅथरीनाच्या बरोबर फोर्ब्जच्या यादीत 1456 व्या क्रमांकावर आहे. मात्र वयाच्या 19 व्या वर्षी अब्जाधीश म्हणून ती जगातील सर्वात तरुण ठरली आहे.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft