Home -

पाकिस्तानातील दबलेला आवाज ‘कंदील’

September 26, 2017 By lakshavedh

share this article

पाकिस्तानातील सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखली जाणारी कंदील बलोच हिची 2016 मध्ये तिच्याच भावाने गळा आवळून हत्या केली. खोट्या प्रतिष्ठेसाठी धर्माचे दाखले देऊन महिलांना बंदिस्त ठेवणाऱ्या पाकिस्तानी समाजात एक विद्रोही महिला म्हणून कंदील ओळखली जायची मात्र धर्माच्या ठेकेदारांना ते पसंत नव्हते, म्हणून तिच्या विरोधात नेहमीच फतवे काढले जायचे. मात्र ती या सगळ्यांना न घाबरता तिला ज्या गोष्टी पसंत आहेत त्या मोकळेपणाने करण्यावर तिने नेहमीच भर दिला. तिच्या कपड्यावरून, बोलण्यावरून टीका करणारे पाकिस्तानी सोशल मिडीआयवर मात्र तिचे नाव सर्च करण्यात अग्रेसर होते. पाकिस्तानी मध्यमवर्गाची ती ‘हिरोइन’ होती. समाजाच्या दांभिकपणावर ती नेहमीच टीका करायची, त्यामुळे पाकिस्तानातील पुरोगामी गट तिला प्रोत्साहन देत होता. मात्र, डोळ्यावर धर्माची पट्टी बांधणाऱ्या भावाला तिचे वागणे खटल्याने त्याने तिचा गळा आवळला, पाकिस्तानातील या मॉडर्न स्टारला ‘द गार्डियन’ या माध्यमाने श्रद्धांजली देण्यासाठी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. सर्वांनी अवश्य बघावा.

(Courtesy -The Guardian)

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft