Home - India-भारत

काॅंग्रेससह डावेही मुक्तीच्या वाटेवर !

March 4, 2018 By lakshavedhTags

share this article

India-भारत

काॅंग्रेससह डावेही मुक्तीच्या वाटेवर !

2012 च्या सुरवातीलाच देशाच्या पंतप्रधानासाठी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र भाई मोदी यांची चर्चा जोरात सुरू झाली होती. त्यावेळी सोशल मिडिया सुद्धा देशासाठी बऱ्यापैकी नवीन असल्याने याच्या वापराने कुणी पंतप्रधान बनू शकतो काय, असा प्रश्न त्यावेळी अनेकांनी उपस्थित केला होता. परंतु जेव्हा मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले, त्यावेळी अनेकांना सोशल मिडियाच्या प्रभाव समजला. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा आणि त्यांचे विरोधक यांच्यात हाच काय तो फरक.  हे दोघ विरोधकांपेक्षा नेहमिच एक पाउल पुढे असतात, त्रिपुराच्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्याप्रमाणे 60 वर्षापासून सत्तेवर असलेल्या काॅंग्रेसला धारातीर्थी पडावे लागले त्याचप्रमाणे 1988 ते 1993 काॅंग्रेसचा अपवाद वगळल्यास 25 वर्षांपेक्षा अधिक काळ सत्त्तेवर असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा मोदी लाटेसमोर अक्षरशः नांगी टाकवी लागल्याचे त्रिपुराच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले.  2014 साली लोकसभा निवडणुकीदरम्यान काॅंग्रेसमुक्त भारताचा नारा देताना कुठेतरी कम्युनिस्टमुक्त किंवा डावेमुक्त भारताचाही नारा देण्यात आला. परंतु त्यावेळेस तो इतक्या प्रकर्षाने जानवला नाही. जितका त्रिपुराच्या निकालावरून जानवू लागला आहे. आता केवळ केरळमध्ये डावे शिल्लक आहेत. स्वच्छ प्रतिमा ठेवून राज्य चालत नसते, नेत्याच्या अंगी कार्यकुशलता असायलाच हवी राजकारणातला हा साधा नियम पायदळी तुडवून मार्क्सच्या उपदेशावर चालणे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार व त्यांच्या काॅम्रेड्सना चांगलेच माहागात पडले. स्वतः स्मार्टफोन सुद्धा वापरत नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची एक मोटार सुद्धा नाही. आपल्या मानधनातील अधिक वाटा पक्षासाठी किंवा समाजकार्यासाठी दान करणारे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांना हाच स्वभाव भारी पडला. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ज्या राज्यातील जनतेला मार्क्स कोण, हे माहिती नसताना त्यांना त्यांच्या उपदेशावर किंवा त्यांनी सुचविलेल्या व्यवस्थेवर नेण्याचा प्रयत्न किती अलंगट येउ शकतो हे कालच्या निकावरून स्पष्ट झाले. केंद्रात एकीकडे सातवे वेतन आयोग चालू असतांना आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना चैथे वेतन आयोग देणे, उद्योग धंद्यांच्या स्थापनेकरिता चर्चेसाठी आलेल्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंना भेट नकारणेे. राज्यात सरकारी नोकरी व्यतीरिक्त दुसरा कुठलाच रोजगार निर्माण न करणे, या सारखे अनेक हेकेखोर निर्णय माणिक सरकाने घेतले. यामुळेच आज डाव्यांचा गड समजल्या जाणारा त्रिपुरा गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली. नेमकी हीच बाब हेरून भाजपने 3 वर्षापूर्वीच मोर्चेबांधनीला सुरवात केली होती. गेल्या दोन वर्षात त्रिपुर्याला 52 केंद्रीय मंत्र्यांनी भेट दिली. पंतप्रधांनानी विविध विकास कामांचे उद्घाटन केले. एकेकाळी संघाला स्थान नसलेल्या राज्यात आज इतक्या उत्स्फूर्तपणे स्वीकारने हे त्यांच्या कामाची पोचपावती होय. आदिवासी, ख्रिश्चन, मुस्लीम बंगाली समाजाचे प्राबल्य असतांनाही भाजपला भरभरून मते मिळाली. विशेष करून बंगाली समाज भाजपच्या पाठीमागे भक्कमपणे उभा दिसला. यावरून येत्या काळात बंगालमध्ये दीदींना मोठे आव्हान उभे राहील याचे संकेत मिळाले. तर आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे त्रिपुराचे उपमुख्यमंत्री अघोर देबर यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. अनेक कडव्या डाव्या विचाराधारेची मते देखील फुटली. त्यामुळे केरळचा मार्ग आता डाव्यांसाठी सरळ नाही. एकंदरीत भाजपच्या या एकतर्फी विजयाने भविष्यातील राजकारणाचे चित्र बदलले आहे. तर दुसरीकडे काॅंग्रेस वाटचाल खरच मुक्तीच्या दिशेने तर नाही ना, अशी शंका आता त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft