Home - Middle East

‘ड्रायव्हींग‘चे स्वातंत्र्य दिले, इतर स्वातंत्र्याचे काय?

September 28, 2017 By lakshavedhTags

share this article

Middle East

‘ड्रायव्हींग‘चे स्वातंत्र्य दिले, इतर स्वातंत्र्याचे काय?

सौदी अरेबियामध्ये नुकतेच स्त्रीयांना वाहन चालविण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. त्यानिमित्त जगभरातून आनंद व्यक्त होतो आहे. सौदीचे राजे सलमान यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला, खरे तर सौदींतील स्त्रीयांसाठी हा निर्णय ऐतिहासिकच. परंतु एकविसाव्या शतकात स्त्रीयांना वाहन चालिवण्यिासाठी देखील लढा द्यावा लागतो आणि परवानगी मिळाल्यावर त्या निर्णयाला ऐतिहासिक म्हणून साजरा करावा का, हा खरा प्रश्न सौदीसह जगभरातून यानिमित्ताने उपस्थित व्हायला हवा.

पुरूषी वर्चस्वाला धक्का लागू नये म्हणून धर्माच्या आड स्त्रीयांवर बंधने लादणे शेकडो वर्षापासून सुरू आहे. अनेक देशामध्ये ही प्रवृत्ती आजही तग घरून आहे. सौदी अरेबिया त्याचे जीवंत उदाहरण होय. एखद्या बंधनाचा अतिरेक झाला की विरोधाचा उद्रेक होतो. मग त्यातून क्रांती घडून इतिहासच बदलतो. जागात या संदर्भात अनेक पुरावे आहेत. सौदी येथे महिलांनी दिलेला लढा त्याचेेच द्योतक होय. केवळ धर्माची बंधणे असल्यामुळे त्यांच्या लढ्याला हवे तीतके पाठबळ मिळाले नाही. केवळ स्त्री म्हणून अनेक अधिकारांपासून वंचित ठेवणे आणि त्यांची गळचेपी करणे म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघनच होय. परंतु कुठलीही मानव अधिकार संघटना याकरिता लढतांना दिसत नाही. सौदीत सुद्धा हे घडले. त्यामुळेच स्त्रीयांना रस्त्यावर उतरावे लागले. सौदीमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या स्त्रीयांचे प्रमाण पुरूषांच्या तुलने अधिक आहे. तेथील 91 टक्के स्त्रीया शिक्षित आहेत. मात्र, त्यांना एखाद्या कंपनीत किंवा सरकारी संस्थांमध्ये कामे करण्यास परवानगी नाही. इतकेच नव्हे तर त्यांना मतदान करण्याचा अधिकार 2015 साली देण्यात आला. स्त्री हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे आता कुठे सौदीतील स्त्रींयाना काही प्रमाणात अधिकार प्राप्त होत आहेत. वाहन चालिविणे ही केवळ सुरवात असून येथील स्त्रीयांसमोर अनेक मोठी आव्हाने अद्याप शिल्लक आहे. त्यापैकी राजेशाही व्यवस्थेला स्त्रीयांच्याबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वात मोठा अडथळा आहे. एखादी निर्णय घेताना त्यांना पुरूषांच्या परवानगी शिवाय पुढे जातच येत नाही. यासाठी सौदी अरेबियातील महिलांनी सोशल मिडियावर #IamMyOwnGuardian सारखे आंदोलन चालविले आहे. जगातील कुठल्या स्त्रीला चांगले कपडे घालून मेकअप करायला आवडत नसेल. मात्र, सौदीमध्ये स्त्रीयांनी याची कल्पना करणे सुद्धा गुन्हाच. धार्मिक पोलिसांचे यावर चांगलेच लक्ष असते. तेथील स्त्रीयांना केसापासून पायाच्या नखपर्यंत पूर्ण झाकलेले कपडे घालवे लागते. बुर्खा सारखा प्रकार असलेला ‘अबाया’ घालणे बंधनकारक आहे. काही दिवसांपूर्वी रियाद वाळवंटात एक सौदी स्त्री मिनी स्कर्ट घालून फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरात गोंधळ उडाला होता. इतकचे नव्हे तर त्या महिलेला पोलिसांनी अटक केली होती. यासोबतच महिलांना अनोळखी व्यक्तीसोबत बोलू नये, अशी सक्त ताकीद आहे. याकरिता तेथील कार्यालय, विद्यापीठ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये स्त्रीयांना जाण्यासाठी वेगळा मार्ग तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा नियम मोडल्यास पुरूषांना सोडून महिलांनाच शिक्षा करण्याचा तालीबानी प्रकार येथे होतो. येथील स्वीमींग पूलमध्ये महिलांना जाण्यास सक्त मनाई आहे. काही दिवसांपूर्वी रियुटर्सच्या संपादक अर्लिन गेट्स एका हाॅटेलमध्ये स्वीमींग करण्यासाठी गेल्या असता त्यांना तेथून हिसकावून लावण्यात आले. एवढे नाही तर त्यांना पुरूष असलेल्या स्वीमींग पूलकडे बघण्यास सुद्धा मनाई करण्यात आली. आपल्या देशातील स्त्रीया सर्व खेळामध्ये अव्वल कामगिरी बजावत आहे. परंतु सौदीमध्ये खेळात सहभागी होण आजही तेथील स्त्रीयांसाठी स्वप्नच आहे. 2012 साली लंडन आॅलंपिकमध्ये सौदीतील एक महिला खेळाडू सहभागी झाली होती. तिला तेथील धर्मांधांनी वेश्या म्हणून संबोधले होते. खेळताना डोके सुद्ध पूर्णपणे झाकलेले हवे असा त्यांचा अटृटाहस आहे. शाॅपींग हा शब्द केवळ महिलांसाठीच शोधण्यात आला की काय, अस प्रश्न आपल्याला पडतो. शहरापासून गावापर्यंत विविध दुकानांमध्ये खरेदी करताना आपल्याला महिलाच आघाडीवर दिसून येतात. विशेष करून कपड्यांच्या दुकानात तर गर्दीचा उच्चांकच असतो. आता कपडे घेतल्यावर ट्राय तर करावेच लागते. परंतु सौदीमध्ये महिलांना कपडे घेतल्यावर ट्राय करण्यास परवानगी नाही. एखाद्या बुकस्टोरमध्ये किंवा ग्रंथालयात महिलांनी कमी कपडे घातलेल्या माॅडलचा फोटो असलेले मॅग्झीन घेणे किंवा वाचणे गुन्हाच आहे. या भयावह परिस्थितीत महिलांनी स्वतःला परिस्थितीअनुरूप बदलले असले तरी केवळ स्त्री म्हणून जन्म घेतल्यामुळे आपल्यावर बंधणे लादणे त्यांच्या मनाला कधीच पटत नाही. पारंपारिक पुरूषी वर्चस्वामुळे त्यांना अनेकदा बंड सुद्ध करता येत नाही. केवळ सौदीच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये ही बंधणे आहेच, काही ठिकाणी या बंधणांनाचे स्वरूप बदलले एवढाच काय तो फरक. हळूहळू का होईना परिस्थितीत बदल घडून येत आहे. जगातील सर्वच क्षेत्र महिलांनी पादाक्रांत केलेली आहे. तरी सुद्धा त्यांना डांबून ठेवण्यात मर्दपणा समजणार्या पुरूषांची संख्या आपल्या समाजात कमी नाही. त्यामुळे केवळ ‘ड्राव्हींग’ची परवानगी मिळवून लढा जिंकला आणि हा निर्णय ऐतिहासिक वैगेरे म्हणणे तेथील स्त्रीयांसाठी सद्यातरी स्वप्नवत आहे.

              – Sumit Pakalwar

 

 

 

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft