Home - Middle EastWorld

तब्बल, 30 वर्षांनी गवसला बेपत्ता वैमानिक

June 2, 2018 By lakshavedhTags

share this article

Middle East

World

तब्बल, 30 वर्षांनी गवसला बेपत्ता वैमानिक

होय, तब्बल 30 वर्षानंतर युद्धामध्ये बेपत्ता झालेला रशियन वैमानिकाचा पत्ता लागला असल्याच्या वृत्ताला रशियाने दुजोरा दिला आहे. मात्र नाव जाहीर करण्यास नकार दिला. सोवियत युनियनचे लढावू विमान घेवून निघालेला हा वैमानिक 1987 साली झालेल्या युद्धा दरम्यान बेपत्ता झाला होता. रशियन अधिकाऱ्यांनी वृत्त संस्थांना दिलेल्या मुलाखतीत बेपत्ता वैमानिक गवसल्याचे सांगितले व त्याला परत रशियामध्ये नेण्यासाठी ते प्रयत्नरत असल्याचेही मान्य केले.

त्याकाळी युद्धानंतर निर्वासित सैनिकांना आधार देण्यासाठी अफगानिस्तानजवळ असलेल्या पाकिस्तानी सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या होत्या. या छावण्यांमध्ये हा वैमानिक वास्तव्यास होता. दरम्यान त्याने येथील भाषा देखील आत्मसात केली. आज त्याचे वय 60 वर्षे इतके आहे. तत्कालीन सोवियत युनियनने युद्धामध्ये बेपत्ता सैनिकांना परत आणण्यासाठी कार्यक्रम राबविला होता. काही काळानंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला. त्यामुळे आता या बेपत्ता वैमानिकाला स्वदेशात जाण्याचा मार्ग जवळपास बंद झाल्याचे रशियन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. येथील लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे मला अफगानिस्ताना राहणे आवडते व त्यामुळे मी इस्लाम धर्म स्वीकारला असे या वैमानिकाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतील स्पष्ट केले आहे. विषेश म्हणजे युद्धात जाण्यापूर्वी या वैमानिकाची एक वर्षाची मुलगी आता 31 वर्षांची झाली आहे.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft