Home - World

पाकिस्तानातील ही दहशतवादी संघटना राजकारणात

August 8, 2017 By lakshavedhTags

share this article

World

पाकिस्तानातील ही दहशतवादी संघटना राजकारणात

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याची जमात उल दावा ही  दहशतवादी संघटना राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न करणार असून यासाठी ‘मिली मुस्लिम लीग’ या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात अली आहे. पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार सध्या नजरकैदेत असलेल्या हाफिज सईदने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने पाकिस्तान निवडणूक आयोगाकडे या संदर्भात अर्ज केला आहे.

सध्या पाकिस्तानात असलेली राजकीय अस्वस्थता यामुळे देशाची सर्व सूत्रे विदेशी शक्तींकडे असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. तसेच गत काही काळापासून प्रस्थापित राजकारण्यांनी धर्मनिरपेक्षता आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली संविधानाला अपेक्षित मुस्लिम राष्ट्राच्या संकल्पनेला तडा दिला आहे. यापुढे राजकारणात उतरून पाकिस्तानला पूर्ण इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा मानस या संघटनेकडून व्यक्त करण्यात आल्याने येणाऱ्या काळात पाकिस्तानात संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft