Home - India-भारत

संयुक्त राष्ट्राचेे महत्व..

September 25, 2017 By lakshavedhTags

share this article

India-भारत

संयुक्त राष्ट्राचेे महत्व..

संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक परिषदेमध्ये भारताने दहशतवादावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले, प्रत्युत्तरात पाकिस्तानने इराक येथील एका जखमी मुलीचे छायाचित्र दाखवून भारतच दहशतवाद पसरवित असल्याचा आरोप केला. मात्र, चुकीचे छायाचित्र दाखवून भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न जगासमोर उघड झाल्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानच्या खोटारडेपणावर संयुक्त राष्ट्र परिषेदमध्ये भारताने पाकिस्तानविरोधात प्रस्ताव ठेवावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. संयुक्त राष्ट्राबाबात आपण नेमहीच ऐकत असतो. विविध परिषदांमध्ये जगभरातील अनेक देश सहभागी होउन विविध विषय मांडतात. मात्र, यामुळे नेमके काय परिणाम होतात किंवा ऊ शकतात. यासंदर्भात फारसे समोर येत नाही. या बाबत आज आपण चर्चा करणार आहोत.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगात शांतता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी 24 आॅक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली. अमेरिकेतील न्युयाॅर्क शहरात या संस्थेचे मुख्यालय आहे. गेल्या वर्षी या संस्थेने 70 वर्षे पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, मानवाधिकाराचे संरक्षण सारख्या विषयावर संयुक्त राष्ट्र कार्यरत असतात. स्थापनेच्यावेळी 50 देशांनी अधिकरपत्रावर स्वाक्षरी केली होती. आज या संस्थेमध्ये 193 देश सदस्य आहेत. खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धामुळे झालेला विध्वंस पुन्हा घडू नये म्हणून संयुक्त राष्ट्र ही संस्था स्थापन करण्यात आली, असे म्हणणे योग्य ठरेल. ज्या देशांनी दुसऱ्या महायुद्धाच्या झळा सोसल्या व जे विजयी झाले, त्यांना असे युद्ध पुन्हा नको होते.

संयुक्त राष्ट्राचे सभागृह

संयुक्त राष्ट्र संघाच्या संरचनेत सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका, फ्रन्स, रशिया व ब्रिटन सारख्या देशाचे प्राबल्य आहे. या संस्थेअंतर्गत सुरक्षा परिषद, आम सभा, आर्थिक व सामाजिक परिषद, सचिवालय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय येतात. यामध्ये अरबी, चीनी, फ्रान्स, रशिया व स्पेन देशातील एकूण 6 भाषांना प्रमुख भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तर संयुक्त राष्ट्राचे कामकाज ब्रिटन इंग्लीशमधून चालते. संयुक्त राष्ट्रांतर्गत एकूण 17 विविध जागतिक संस्था कार्यरत आहेत. दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान संयुक्त राष्ट्राची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येते. यामध्ये सदस्य देश सहभागी होतात. सभेमध्ये सर्वच देशांना बोलण्याची संधी दिल्या जाते. संयुक्त राष्ट्राला सदस्य देशांतील अंतर्गत वाद, आर्थिक व सामाजिक समस्या, सुरक्षा विषयक प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून ते सोडविण्याचा अधिकार आहे. इतकेच नव्हे तर यासाठी गरज पडल्यास सैन्याचा देखील वापर करता येतो. त्यामुळेच उत्तर कोरिया सारख्या देशांवर आजही वचक आहे. जवळपास सर्वच देशासाठी महत्वाचे असलेल्या आर्थिक विषयावर संयुक्त राष्ट्राचे बारीक लक्ष असते. एखाद्या देशाने मुजोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची आर्थिक कोंडी करणे हा प्राथमिक उपचार आहे. यामुळे त्या देशासोबतचे सर्वच आयात व निर्यातीवर निर्बंघ लादण्याचा अधिकार देखील संयुक्त राष्ट्राला आहे. एकंदरीत आंतराष्ट्रीय स्तरावील समस्यांचा निकाल येथे लावण्यात येतो. मात्र बऱ्याचदा प्रभावी देशांसमोर लहान देशाना तितकेसे महत्व प्राप्त होत नसल्याने या देशांची संयुक्त राष्ट्रावर नेमहीच नाराजी असते. काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्राचीच देण होय. त्यामळे भारताने सर्वसाधारण सभेमध्ये पाकिस्तान विरोधात ठराव आणल्यास फारसा काही फरक पडणार नाही. संयुक्त राष्ट्राचे सुरक्षा परिषद सर्वात प्रभावी समजल्या जाते. यामध्ये अमेरिका, चिन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स हे नियमित सदस्य असल्याने त्यांचा प्रभाव सुद्धा इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. भारताला अद्याप नियमित सदस्याचा दर्जा नसल्याने पाकिस्तान विरोधातील आटापीटा सद्यातरी कामी येणार नाही.  

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft