Home - India-भारत

गुजरात विजय आणि बाळाचा कौतुक सोहळा…!

December 19, 2017 By lakshavedhTags

share this article

India-भारत

गुजरात विजय आणि बाळाचा कौतुक सोहळा…!

आपल्या घरात एखाद्या बाळाचा जन्म झाल्यानंतर तो मोठा होतपर्यंत त्याचे कौतुक सोहळे चालतात, बाळाचे पहिले पाउल, पहिले शब्द, त्याने खाल्लेला जेवणाचा पहिला घास या सर्वाचे घरातील मंडळीला फारच अप्रुप वाटत असते नेमके तेच गुजरात हरल्यानंतर काॅंग्रेसच्या गोटात चालू आहे. पराभव हा पराभव असतो, त्याला पर्याय नसतो, हे आपल्या सर्वांना चांगल्याप्रकारे ठाउक आहे. तरीसुद्धा राहुल गांधींचे जे कौतुक सोहळे सुरू आहे ते नक्कीच त्यांच्यापेक्षाही बालीशपणाचे आहे.

खेळात एखादी सामना हरल्यानंतर तो संघ पराभूत संघ म्हणूनच गणल्या जातो, काॅंग्रेस सुद्धा आजघडीला पराभूत संघच आहे. परंतु गुजरातमध्ये गतवेळेपेक्षा भाजपला कमी जागा मिळाल्याचा आनंद काॅंग्रेस ज्याप्रकारे साजरे करत आहे त्यावरून त्यांच्या गोटात नेमकी काय परिस्थिती आहे याचा आपण अंदाज तर नक्कीच घेउ शकतो. संसंदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांनी निवडून दिलेलाच राजकीय पक्ष देश चालवतो. तरी सुद्धा त्यांच्या निवडीबद्दल शंका उपस्थित करून लोकांना मुर्खात काढण्याचा प्रकार काॅंग्रेसकडून मोदी सरकार आल्यापासून चालू आहे. स्वतंत्र झाल्यापासून देशातील काही प्रमुख समस्या सोडविण्यात कोणत्याच राजकीय पक्षाला यश आले नाही. त्यात सर्वाधिक काळ काॅंग्रेसने देशावर राज्य केले. त्यामुळे याचे खापर काॅंग्रेसवरच फुटणार याबाबत दुमत असूच नये. परंतु संधी देउन सुद्धा भाजपने या समस्या सोडविल्या नाही तर त्याची जबाबदारी भाजपने घ्यायलाच हवी. मात्र तसे न करता काहीतरी फुटकळ मुद्यांवर निवडणूक लढवायची आणि निवडून आल्यानंतर मोठ मोठ्या थापा मारायच्या हे काही योग्य नाही. म्हणून गुजरातमधील जनतेने भाजपला अल्टीमेटम दिला. काॅंग्रेसला कधी नव्हे इतका प्रतिसाद गुजरामधील जनतेने दिला. यात राहुल गांधी किंवा इतर कुणाचा करिश्मा किंवा राहुलबाबांनी जाणवं घातलं म्हणून वैगेरे काही नाही. तर मोदींनी गेल्या साडेतीन वर्षात ज्या काही थापा मारल्या त्याला प्रतिउत्तर म्हणून गुजरातच्या जनतेने काॅंग्रेसला भरभरून मतदान केले हे लक्षात घेतले पाहिजे. परवाच राहुल गांधी काॅंग्रेसच अध्यक्ष झाले. यापेक्षा थोपविण्यात आले म्हणणे योग्य ठरेल. आणि त्यात गुजरातमध्ये काॅंग्रेसला मिळालेले मतदान लक्षात घेता काही काॅंग्रेसींना तर राहुलबांबांनी चमत्कारच केला असे वाटू लागले आहे. काहींनी तर त्यांना पुढील पंतप्रधान वैगेरे संबोधने सुरू केले आहे. 50 व्या वर्षी स्वताला युवानेते म्हणवून घेणारे राहुल मोंदींना पर्याय ठरू शकत नाही. हे गुजरातच्या जनतेने अप्रत्यक्षणे मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. अन्यथा काॅंग्रेस आज गुजरातमध्ये सत्तेवर असती. राहुल गांधी परवाच अध्यक्ष झाले असले तरी गत दहा वर्षांपासून ते अध्यक्षासारखेच वागत आहे. मनमोहन सरकारच्या काळात संसदेमध्ये पंतप्रधांनांच्या पत्राला त्यांनी फाडले होते. तेव्हाच सर्वांच्या ते लक्षात आले. परवा केवळ औपचारीकता ती तेवढी पूर्ण करण्यात आली.

आता राहिला प्रश्न राजकीय गणिताचा तर एखाद्याला जबरदस्तीने किती दूर पर्यंत न्यायचे हे काॅंग्रेसच्या धुरीणांनी ठरवायला हवे. मोदी हे आज पंतप्रधान आहेत ते त्यांच्या स्वकर्तृत्वाने यात कुणीही शंका घेणार नाही.  ते किती बोलबच्चन आहेत हा नंतरचा प्रश्न. तितके कर्तृत्व राहुलबांबांमध्ये आहे काय, किंबहुना त्याच्या आसपास तरी ते जाउ शकतात काय हे काॅंग्रेसजनांना तपासून बघावेच लागेल.  अन्यथा बाळ बोलतो, बाळ चालतोय असे म्हणत एखाद्या अपरिपक्व नेत्याला देशाच्या माथी मारणे देशातील युवकांच्या पचनी पडणार नाही. देशाच्या पंतप्रधानपदी बसणारा व्यक्ती हा कर्तृत्ववान असलाच पाहिजे. देश म्हणजे एखादी प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नव्हे की मालकाचा मुलगा मालक बनेल मग शिकेल आणि त्यानंतर देश चालवेल. बिहार व पंजाबमध्ये लोकांना परिपक्व पर्याय दिसल्यानेच भाजपला सत्तेपासून दूर राहावे लगले. इतके सुरू असताना सुद्धा काही लोक कौतुक करण्यातच मग्न आहेत. राहुल हे कसे शिवभक्त, जाणवेधारी आहेत हे सुद्धा सांगण्यात ते मागे नाही. बहुदा त्यांनी देशातील जनतेला मुर्ख समजले असावे अन्यथा ते स्वता मुर्ख आहेत. दोन महिन्याच्या उठाठेवीनंतर जो निर्णय येणार होता तोच आला. तरी सुद्धा त्याचे विश्लेषण ज्याप्रकारे करण्यात येत आहे. त्यावरून त्यांना राहुलबांबांमध्ये पंतप्रधान होण्याचे गुण का दिसले हे समजून आलेच. मोदीभक्तांना उत्तर म्हणून राहुल भक्त तयार करणे हे मोंदींना पर्याय असूच शकत नाही. किंबहुना तसा प्रयत्नही कुणी करू नये. अन्यथा मोंदींना विजयरथ रोखण्यात बरीच दमछाक करावी लागणार हे मात्र निश्चीत.

टीप- आम्ही मोदी भक्त नाही. असे वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft