Home - India-भारत

धक्कादायक ; वर्षभरात महाराष्ट्रातील 3 हजार मुली बेपत्ता

December 20, 2017 By lakshavedhTags

share this article

India-भारत

धक्कादायक ; वर्षभरात महाराष्ट्रातील 3 हजार मुली बेपत्ता

वर्षभरात महाराष्ट्रातील जवळपास 3 हजार मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इतकेच नव्हे तर राज्यात दररोज सरासरी 16 मुली बेपत्ता होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जानेवारीपासून महाराष्ट्रात 2965 मुली बेपत्ता झाल्या आहे.
भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनीविधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. राज्यात 1 जानेवारी ते 30 जून दरम्यान 2965 मुली बेपत्ता झाल्या. गेल्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये 2,881 मुली बेपत्ता झाल्या होत्या, असे ते म्हणाले.

स्वतः गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या संदर्भात कोणत्याही विशिष्ट टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र 12 पोलिस विभागांना अशा प्रकारांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बेपत्ता मुलांचा माग काढण्यासाठी केंद्र सरकारने www.trackthemissingchild.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे, तसेच रेल्वेनेही www.shodh.gov.in हे पोर्टल अद्ययावत केले आहे. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी या संकेतस्थळांची मोठी मदत होत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारने ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन स्माईल यांसारख्या चार विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यामुळे 1 जानेवारी ते 30 जून 2016 1,613 मुलींना शोधण्यात मदत झाली आहे. त्याचप्रमाणे यावर्षी 645 मुलींना शोधण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft