Home - Technology

पहिल्या पॉकेटसाईझ संगणकाबद्दल माहितीये का ?

June 1, 2018 By lakshavedhTags

share this article

Technology

पहिल्या पॉकेटसाईझ संगणकाबद्दल माहितीये का ?

जपानी टेक कंपनी किंग जिमने जगातील पहिला पॉकेट साईज मिनी संगणक फोल्डिंग कि बोर्डसह सादर केला असून त्याचे नाव ई इंक टाईपरायटर असे आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व ई बुक रीडर व टॅब्लेटवर सहज सुलभ टायपिंग सुविधा देणारे हे पहिलेच उपकरण असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हि कंपनी पोमेरा नावाने खूप छोट्या आकाराचे टायपिंग संगणक बनविते.या सिरीजमधला हा नवा संगणक कुठेही न्या असा असून गरज असेल तेव्हा कीबोर्ड उघडा, काम करा, संपले की कीबोर्ड सह पूर्ण फोल्ड करून खिशात घाला या पद्धतीचा आहे. यात टाईप केलेले टेक्स्ट क्यूआर कोड किंवा मायक्रोएसडी च्या सहाय्यने ट्रान्स्फर करता येणार आहे. कीबोर्ड तीन फोल्ड घालून बंद करता येतो तसेच ६ इंची पेपर स्क्रीन डिस्प्ले याला दिला गेला आहे. अमेरिकेत हा संगणक ३४९ डॉलर्स मध्ये उपलब्ध करून दिला गेला आहे. त्यानंतर तो जपान मध्ये लाँच केला जाणार आहे.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft