Home - AsiaIndia-भारत

गडचिरोलीतील शंभरपेक्षा अधिक बालमृत्यूला जबाबदार कोण ?

November 3, 2018 By lakshavedhTags

share this article

Asia

India-भारत

गडचिरोलीतील शंभरपेक्षा अधिक बालमृत्यूला जबाबदार कोण ?

नक्षलग्रस्त आणि मागास असा शिक्का माथी असेलाला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख. तरीही राजकीय व प्रशासनिक दुर्लक्षामुळे गडचिरोलीवरचे विघ्न वाढतच चालल्याचे चित्र असून तिन महिन्यात शंभरावर नवजात बालमृत्यूमुळे जिल्ह्यातील विदारक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व मृत्यू सहा महिन्यापूर्वी अस्तीत्वात आलेल्या शासकीय महिला व बाल रूग्णालयात झाले आहे. तरीही प्रशासनाने अद्याप कुणावरही कारवाई तर सोडाच गंभीरपणे चौकशी करण्याचे औदार्य सुद्धा दाखविले नसल्याने सर्व स्तरातून नाराजीचे सूर उमटत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय स्थीती नवी नाही. इथे आलेले अधिकारी देखील विशेष लक्ष देत नाहीत. केवळ नोकरीचा सोपस्कार पार पडतात व निघून जातात त्यामुळे प्रशासनीक स्तरावर कुणाचाही अंकुश नाही. त्यामुळे कितीही मोठी सरकारी सुविधा उपलब्ध केल्यावरही त्याचा फज्जा उडतो. गडचिरोलीतल शासकीस महिला व बाल रूग्णालय त्याचेच जिवंत उदाहरण होय. मोठ्या थाटामाटात या रूग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. यामाध्यमातून गरोदर स्त्रीया व नवजात बालकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळेल अशी अपेक्षा होती पण हे रूग्णालय आता मृत्यूचा सापळा ठरत आहे. गत चार महिन्यात शंभरपेक्षा अधिक बालकांच्या मृत्यू झाल्यानंतरही राज्यात या बाबतीत कुठेही चर्चा नाही की माध्यमांमध्ये बातम्या नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची दखल ‘लक्षवेध’ने घेतलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे केवळ उद्घाटन करताना दिसतात परंतु असे एखादी प्रकरण पुढे आल्यावर त्यात लक्ष घालताना दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय वचक सुद्धा संपल्यात जमा आहे. अशा परिस्थीत गडचिरोली जिल्ह्यातील गरीब, आदीवासी जनतेने कुणाकडे जावे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. हीच घटना एखाद्या शहरात घडली असती तर आत्तापर्यंत प्रशासनात भूकंप झाला असता परंतु हे प्रकरण गडचिरोली सारख्या मागास भागात घडल्यामुळे कुणीही याबद्दल बोलण्यास तयार देखील नाही. यानिमित्ताने राजकीय व प्रशासकीय भेदभाव आपल्याला दिसून येतो. गेल्या कित्येक वर्षांपासून असाच प्रकार सुरू असल्याने गडचिरोली जिल्हा आपल्या माथी असेला नक्षलग्रस्त व मागासलेपणाचा शिक्का पुसण्यात अपयशी ठरत आहे. तर दुसरीकडे पोलिस – नक्षल चकमीत नक्षलवादी मारल्या गेल्यास मानवअधिकाराचा कांगावा करीत येणारे समाजसेवक व त्यांच्या संस्था देखील याकडे लक्ष देण्यास तयार नाही. या संदर्भात सबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास ते चौकशी सुरू आहे, आमच्याकडे मनुष्यबळ अपुरे आहेत असे मोघम उत्तरं देतात. एकीकडे सरकार मोठ मोठ्या योजना, पुतळ्यांवरत कोट्यवंधीची उधळपट्टी करीत असताना 100 नवजात बालकांचा अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे मृत्यू होणे दुर्दैवी आहे.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft