Home - World

तर भारतावर सर्जिकल स्ट्राईक करू !

August 8, 2017 By lakshavedhTags

share this article

World

तर भारतावर सर्जिकल स्ट्राईक करू !

डोकलामवरून चीन आणि भारत दरम्यान सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. चीनी सरकारी वृत्तपत्र द ग्लोबल टाईम्समध्ये आलेल्या एका लेखात चिनी सुरक्षा तज्ञांनी बिजिंगतर्फे भारतावर येत्या 15 दिवसांत सर्जिकल स्ट्राईक केले जाण्याचे संकेत दिले आहेत. सिक्कीम मधील डोकलाम भागात तळ देऊन असलेल्या भारतीय जवानांना हुसकवून लावण्यासाठी हे स्ट्राईक केले जातील असे त्याचे म्हणणे आहे.

डोकलाम सीमेवरून गेले दोन महिने भारत व चीन यांच्यात वाद पेटला आहे. भारताने चीनमध्ये घुसखोरी केली असल्याचा आरोप चीनकडून केला जात आहे तर भारताने चीननेच हा भाग बळकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हणणे मांडले आहे. चिनी तज्ञांच्या मते हा वाद अधिक रेंगाळणे चीनला परवडणारे नाही व यामुळेच छोटे छोटे लष्करी हल्ले करण्याची तयारी चीन करत आहे. चिनी तज्ञ हू झियांग यांनी असे हल्ले करण्यापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला सावधनतेची सूचना चीनकडून दिली जाईल असे मत व्यक्त केले आहे.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft