Home - India-भारतUncatagarised

भीमा कोरेगाव; हिंसेपेक्षा चर्चा राजकीय नेतृत्वाचीच..!

January 8, 2018 By lakshavedhTags

share this article

India-भारत

Uncatagarised

भीमा कोरेगाव; हिंसेपेक्षा चर्चा राजकीय नेतृत्वाचीच..!

आधी समाजकारण मग राजकारण, असे वक्तव्य प्रत्येक राजकारण्यांच्या तोंडातून ऐकायला मिळत असते. प्रत्येक राजकीय भाषणामध्ये या ओळीचा पुनरूच्चार न झाल्यास उपस्थितांना आश्चर्य वाटावे. परंतु राजकीय डावपेच आणि यातून निर्माण झालेला ‘पेच’ सोडवता सोडवता कधी समाज पेटविला जातो हे आपल्याला लक्षातच येत नाही. नववर्षाला झालेली भीमा कोरेगाव हिंसा हे याचे ताजे उदाहरण होय. आपल्या समाजामध्ये राजकीय प्रभाव खूप खोलवर भीनलाय, त्यामुळे प्रत्येेक राजकीय घडामोडीला परिणाम अलगद दिसून येतो. मग तो देशप्रेमाच्या नावावर असो की जाती, धर्माच्या, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते राडा करण्यास सदैव तयार असतात. त्याचे परिणाम काय होतील याची मात्र चिंता कुणालाही नसते.

200 वर्षापूर्वी इंग्रज सैन्यामधल्या दलीत समाजाच्या जवानांनी पेशव्यांचा पराभव केला होता. हा विजय साजरा करण्यासाठी 1 जानेवारीला पुण्याजवळील भीमा कोरेगावात राज्यातून दलीत बांधव एकत्र आले होते. त्यांच्यावर काही समाजकंटकांनी दगडफेक केली यातून सुरू झालेल्या हिंसेचे लोण राज्यभर पसरले, यामुळे सामान्यांना बराच त्रास सहन करावा लागला. यावर माध्यमांमध्ये अद्याप चर्चा सुरूच आहे. इतकेच नव्हे तर या निमित्ताने नव दलित नेतृत्वाचा उदय झाल्याच्या देखील चर्चा माध्यमांमध्ये रंगवण्यात येत आहे. आणि या चर्चांमध्ये येणारे देखील हसमुखाने आंदोलनाच्या यशाचे श्रेय घेत आहेत. खरचं नवतरूणांसाठी हे खूप हास्यास्पद आहे.
विशेष म्हणजे शौर्यदिनापूर्वी पुण्यातील पेशव्यांच्या प्रसिद्ध शनिवारवाड्यामध्ये येल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून गुजरातमध्ये नुकतेच निवडून आलेले दलित नेते जिग्नेश मेवानी व जेनयु दिल्लीचा विद्यार्थी नेता उमर खालीद यांना बोलविण्यात आले. जवळपास दोन वर्षांपूर्वी जवाहरलाल विद्यापीठात काश्मीरी फुटीवाद्यांसोबत मिळून भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात हा उमर खालीद आघाडीवर होता. याचे वडील सीमी या प्रतिबंधींत दहशतवादी संघटनेचे पदाधिकारी होते. आणि नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी व सद्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला प्रा. साईबाबा व हेम मिश्रा यांचा उमर पक्का सहकारी. दलित चळवळीशी याचा तीळमात्र संबंध नाही. तरी सुद्धा दलित चळवळीत आयुष्य घालविलेल्यांपेक्षा या उपद्रवी तरूणांना येल्गार परिषदेचे विशेष निमंत्रण देण्यात आले. अपेक्षेप्रमाणे ते आले व समाजात फूट पडेल अशी प्रक्षोभक भाषणे केली. आणि दुसऱ्या दिवशी दंगल उसळली. याला जबाबदार कोण हा तपासाचा मुद्दा असला तरी, सर्व घटनाक्रम योगायोग असूच शकत नाही. त्यामुळे या घटनेची चैकशी झाली पाहिजे व सत्य काय ते एकदाचे बाहेर यायला हवे. परंतु तशी मागणी न करता. हिंसेनंतर आंदोलनाच्या रूपाने प्रतिहिंसा कशी झाली. व बंद यशस्वी कसा झाला. हे पटवून देण्यात नेते मग्न आहेत. यामध्ये कुणाचे किती नुकसान झाले. आंदोलनाच्या नादात किती सुशिक्षित मुलं कोठडीत पडलेली आहे. पुढे त्यांच्या भविष्याचे काय, याबाबत कुणीही बोलताना दिसून येत नाही. उलट नव दलित नेतृत्वाचा उदय होत असल्याची चर्चा सुरू आहे.

काहींनी तर उत्साहाच्या भरात अनेक चितावणीखोर वक्तव्ये देखील केले. मात्र, कुणीही हिंसाचार थांबला पाहिजे यासाठी प्रयत्न केला नाही. खरे तर हिंसेने नेतृत्व कधीच उभे राहत नाही, ही बाब माध्यम आणि राजकारण्यांनी लक्षात घ्यायला हवी. झाले ते दुर्दैवीच, परंतु त्यानंतर जे घडत आहे, ते त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. पुरोगामी माहाराष्ट्राच्या थापा मारणारे नेतेही यात हात धुवून घेत आहे. परंतु हिंसेत शिवाजी महाराजांचे चित्र असलेली टीशर्ट घतलेल्या सवर्ण तरूणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हे कुणालाही दिसत नाहीये. त्या मुलाच्या घरी जावून सांत्वना करण्याचे सौजन्य एकाही नेत्याने दाखविले नाही. हे आजच्या पुरोगामी महाराष्ट्राचे सर्वात मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल. धर्मनिरपेक्ष संविधानावर चालणाऱ्या देशात स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील जाती धर्माच्या नावाखाली हिंसा होत असेल तर सामाजिक व राजकीय आत्मचिंतन करण्याची वेळ आता आली आहे. हे देशातील धुरिणांनी लक्षात घेतले पाहिजे. राहिला प्रश्न राजकीय नेतृत्वाचा तर हिंसेने समाजातील मने जवळ येण्याऐवजी तुटतात. नेतृत्व उदय तर होतो पण तुटलेली मने जोडण्याची क्षमता नेतृत्व गमावतो हेही तितकेच सत्य. पुढे ही घटना कुठले रूप घेईल हे सांगणे फार कठीण असले तरी भूतकाळात जगता येत नाही. त्यासाठी वर्तमानासोबतीने भविष्याची कास धरावीच लागते, हे तितकेच सत्य.

नियमित अपडेट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा 

https://www.facebook.com/Lakshavedh-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7-768421909992803/

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft