Home - AsiaIndia-भारत

आयुष्यमान भारत; काय आहे ही योजना, यामुळे काय होणार ?

August 19, 2018 By lakshavedhTags

share this article

Asia

India-भारत

आयुष्यमान भारत; काय आहे ही योजना, यामुळे काय होणार ?

15 आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्यमान भारत’ योजना 25 सप्टेंबरपासून जनसामान्यांच्या सेवेत येणार अशी घोषणा केली. जवळपास 50 कोटीं नागरिकांच्या आरोग्याला संजीवनी देण्याचे काम या आरोग्य विमा योजनेतून होणार आहे. पण ही योजना लागू करण्याइतपत आपली यंत्रणा सक्षम आहे काय? असा प्रश्न सामान्यांमधून उपस्थित केला जातोय. सरकारतर्फे सद्यस्थितीत सुरू असलेल्या अनेक योजना कचखाउ यंत्रणेमुळे अडगळीत पडलेल्या आहेत. त्यामुळे सरकारी कामाबद्दल लोकांमध्ये विश्वासहर्ता नाही. त्यात आयुष्यमान भारत सारख्या भव्य व देशातील इतक्या मोठ्या लोकसंख्यवेर प्रभाव टाकणाऱ्या योजनेची घोषणा इतक्या सहज पचनी पडण्यासरखी नाही. या योजनेतील तरतूदी खरच अमलात आल्यास सर्वसामान्यांना हा सर्वात मोठा दिलासा ठरेल. जगातील जवळपास सर्वच प्रगत राष्ट्रांमध्ये आरोग्य विमा सारख्या योजना अमलात आहेत. त्यामुळे तेथील नागरिक आरोग्यांसबंधी उपचार खर्चासंदर्भात निश्चींत असतात. परंतु भारतात आजही सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम नाही, त्यात खाजगी रूग्णालयांची लुटमार यामुळे नागरिकांना अनेकदा उपचाराकरिता कर्ज काढावी लागतात. पैश्यांअभावी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो ही वास्तविकता आहे. त्यामुळे अमेरिकेतील ओबमाकेअरच्या धर्तीवर मोदीकेअर अर्थात आयुष्यमान भारत ही योजना अमलात आल्यास राजकीय दृष्ट्या मोदींना मोठ पाठबळ प्राप्त होईल असे अंदाज सुद्धा राजकीय पटलावर मांडले जात आहेत. तर जाणून घेउया या योजनेविषयी.
महत्वाच्या तरतुदी

  • आयुष्यमान योजनेंतर्गत 10 कोटी कुटुंब ( 50 कोटी) नागरिक येणार आहेत.
  • योजनेत येत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रूपायांचे आरोग्य विमा कवच प्राप्त होणार आहे.
  • आरोग्य विम्याच्या माध्यमातून नागरिकांना सरकारी व सरकारशी संलग्नीत सर्व खाजगी रूग्णालयांमध्ये 5 लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार घेता येईल.
  • योजना लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून योजनेचा लाभ मिळेल.

या योजनेच लाभ आर्थिक व सामाजिक पातळीवर झालेल्या जनगणनेच्या आधारावर देण्यात येणार आहे.योजनेचा लाभ घेण्याकरिता आधार सक्तीचे नाही. कुठलेही सरकारी ओळखपत्र ग्राह्य घरण्यात येईल.

पात्रतेच्या अटी
आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकातर्फे आर्थिक व सामाजिक निकष लावण्यात आले आहे.
ग्रामीण भागात मातीच्या भींती असलेल्या दोन खोल्यांमध्ये वास्तव्यास आहेत अशा कुंटुंबाला या योजनेत समाविष्ट करण्यात येईल. ज्यांच्या कुटुंबात 16 ते 59 वयोगटातील सदस्य नाहीत. ज्या कुटुंबाला राहायला घर नाहीत. भूमिहीन, मजूर सुद्धा या योजनेअंतर्गत येणार आहेत.
अनुसूचित जाती व जमातीत मोडणारे कुटुंब. तर शहरी भागातील भिकारी, कचरा उचलणारे, घरकाम करणारे, वाहनचालक, पेंटर, इलेक्ट्र्रीशीयन, चैकीदार, आदी सर्व लहान व मध्यम कामगार वर्गात मोडणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. इतर योजनांच्या अंमलबजावणीत असलेल्या त्रृटी ओळखून या योजनेला योग्यरित्या अमलात आणल्यास कोट्यवधी भारतीयांना मोठा लाभ होणार हे मात्र निश्चित.

———-

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft