Home - Technology

फेसबुकने घेतला ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा’ धसका

August 1, 2017 By lakshavedhTags

share this article

Technology

फेसबुकने घेतला ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा’ धसका

मधल्या काळात’‘थर्ड आय’ या हाॅलिवुडपटामध्ये मानवाला माहिती तंत्रज्ञानातील अतिसंशोधनाचा कसा धोका निर्माण होउ शकतो याबाबत खुलासा करण्यात आला होता. नेमका तोच प्रकार फेसबुकने चालविलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता‘ (आर्टीफिशीयल इंटेलिजन्स) निर्माण संशोधनामध्ये घडल्याने फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गला यातून काढता पाय घ्यावा लागला. संशोधनादरम्यान तयार करण्यात आलेले यंत्र स्वताच कोड निर्माण करू लागल्याने परिस्थिती हाताळणे संशोधकांना जमले नाही. त्यामुळे या संशोधनाला पूर्णविराम देण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

मार्क झुकरबर्गने या संशोधनाचा भविष्यात कसा उपयोग होईल याबाबत एका विडिओद्वारे माहिती प्रसारित केली होती. परंतु या संशोधनामुळे मानवजातील धोका उद्भवू शकतो असा दावा करून तंत्रज्ञान तज्ज्ञांनी मार्कवर बरीच टीका केली. तरी सुद्धा मार्कने सदर संशोधन चालूच ठेवले होते. दरम्यान त्यांने टीकाकारांसोबत चर्चा देखील केली. मात्र, संशोधन थांबविण्यास नकार दिला. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे प्रस्थ इलाॅन मस्क यांनी मार्क झुकरबर्ग मर्यादित विचारांचा असल्याची टीका केली. यामुळे पूर्ण तंत्रज्ञान क्षेत्र ढवळून निघाले होते. परंतु मार्क काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामुळे त्याने संशोधन चालू ठेवले. मात्र, दोन दिवसांपूर्वी संशोधन सुरू असलेल्या यंत्राने कुठल्याही मानव सहकार्याशिवाय स्वताची यंत्रणा निर्माण करण्यास सुरू केल्याने संशोधकांची चांगलीच तारांबळ उडाली, परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाउ नये याकरिता हे संशोधन थांबिण्यात आले. यापूर्वी गुगलने सुद्धा असाच अट्टाहास केला होता, त्यांना सुद्धा अश्याच परिस्थितीचा सामना करावा लागला.
काय आहे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टीफिशिअल इंटेलिजन्स)
आर्टीफिशिअल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणकांच्या सहाय्याने चालणारी स्वयंपूर्ण प्रणाली होय. याचा वापर प्रामुख्याने आवाज ओळखणे, चित्रांच्या मदतीने ओळख पटविणे तसेच भाषांतरासाठी होतो. यावर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. पंरतु यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असल्याने हे संशोधन पूर्ण होउ शकले नाही. अनेकांनी तसा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याहाती निराशाच आली. गुगल व फेसबुक सारख्या कंपन्यासुद्धा यामध्ये अपयशी ठरल्या आहे.


काय धोका निर्माण होऊ शकतो
कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेबाबत जितके कुतूहल आहे, तितकीच भीती देखील आहे. या संशोधनाच्या सुरवातीलाच अनेकांनी याबाबतचे धोके लक्षात आणून दिले होते. ते आज प्रत्यक्षात अनुभवयास येत आहे. ही यंत्रणा स्वताची कोड लॅग्वेज निर्माण करून स्वताच यावर नियंत्रण ठेवू पाहते. यामुळे यावर अधीक संशोधन होउन अशी यंत्रे तयार झाल्यास भविष्यात मानव व यंत्रमानव यांच्यात मोठे युद्ध होउन मानवाचे अस्तीत्व धोक्यात येउ शकते, त्यामुळे सद्यातरी याबाबत संशोधन करू नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft