Home - World

कलम 370 ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

August 8, 2017 By lakshavedhTags

share this article

World

कलम 370 ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे संविधानातील कलम 370 हे कालबाह्य झाले असून यामुळे देशातील एकता व अखंडता धोक्यात आली आहे. त्यामुळे हे कलम रद्द करण्यात यावे अशा मागणीची याचिका विजयलक्ष्मी झा यांनी सर्वाेच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर 8 आॅगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारल नोटीस बाजवून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.
याचिकाकर्त्या विजयलक्ष्मी झा यांनी यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. परंतु ती फेटाळण्यात आल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अपील दाखल केली आहे. याचिकेत करण्यात आलेल्या मागणीनुसार स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संविधानामध्ये कलम 370 चा तात्पुरत्या स्वरूपात अंतर्भाव करण्यात आला. यामुळे जम्मू काश्मीरला एकाच देशात राहून स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु आता या कलमाची वैधता संपुष्टात आली असून या कलमाला रद्द करण्यात यावे. यामुळे देशाची सार्वभौमता व एकता धोक्यात येत असल्याचा दावा याचिकर्त्यानी केला आहे.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft